एसटी आता शंभर टक्के प्रवासी क्षमतेने धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता एसटीच्या लांबपल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस या पूर्वीप्रमाणेच पूर्ण शंभर टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यात येतील असे आदेश एसटी महामंडळाने गुरूवारी काढले आहेत. त्यामुळे 18 सप्टेंबरपासूनच सर्व एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने प्रकासी वाहतूक करणार आहेत.

शेजारील कर्नाटक आणि गुजरात राज्यात 100 टक्के प्रवासी क्षमतेने परिवहन सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळेच याच धर्तीवर राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्येही पूर्ण आसन क्षमतेने गाडय़ा चालविण्याचे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) राहुल तोरो यांनी काढले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांच्या प्रवासावर पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील केवळ ज्येष्ठ नागरीकांना वैद्यकीय कारण तसेच अपवादात्मक स्थितीत प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. आता नेहमीप्रमाणे एसटीची सर्व आसने आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.