होळीसाठी एस.टी सज्ज; कोकणासाठी जादा बस फेऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

यंदा होळीसाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमानी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त जादा बसेसची सोय केली आहे. या बसेस 17 ते 24 मार्चदरम्यान चालवण्यात येणार आहेत. या जादा बस फेऱ्या मुंबई व कोकणातील विविध बसस्थानकातून होणार आहे.

याच काळात 10 वी  व 12 वी च्या परिक्षा संपत असल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा होळीला कोकणात जास्त प्रवासी जाण्याची शक्यता आहे. वाढत्या गर्दीची शक्यता गृहीत धरून महामंडळाने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. 20 मार्चला होळी आहे. कोकणवासीयांना गणपती उत्सवानंतर होळीच्या सणाची प्रचंड उत्सुकता असते. मुंबई व उपनगरात राहणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे सुरक्षितरित्या थेट त्यांच्या गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे. 17 मार्च पासून मुंबई सेंट्रल, परळ व कुर्ला नेहरूनगर या बसस्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त 100 टक्के ग्रुप बुकिंगच्या बसेस, प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांच्या इच्छित स्थळापासून देण्यात येणार आहेत. तथापि, आरक्षणाच्या बसेस या नियोजित बसस्थानकातून सुटतील.

या सर्व बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून public.msrtcorg.com या संकेतस्थळावरून तसेच MSRTC MOBILE RESERVATION अॅप द्वारे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करता येणार आहे.

st-time-table