
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदारसंघात मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावी किंवा आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी आज केले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
मतदार नोंदणी कार्यक्रम
- प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध – 1 नोव्हेंबर 2021
- प्रारूप मतदार याद्यांवर दावे आणि हरकती दाखल करणे – 30 नोव्हेंबर 2021
- दावे आणि हरकती निकाली काढणे – 20 डिसेंबर 2021पर्यंत
- अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध – 5 जानेवारी 2022



























































