बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून जेएनयूमध्ये दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मंगळवारी दगडफेक झाल्याने मोठा गोंधळ उडाला. बंदी असतानाही काही विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत डॉक्युमेंट्री पाहत होते. अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने विद्यापीठातील वीज, इंटरनेट सेवा बंद केली.