सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेरील हिमालय पूलाचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू तर 39 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी आज स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. देसाई विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालय पूलाचा काही भाग सायंकाळी साडे सातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. तर 39 जण जखमी झाले होते.