
जगभरातील समुद्री व्यापाराचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱया सुएझ कालव्यात अडकलेले ‘एव्हर गिव्हन’ जहाज पुन्हा एकदा समुद्रसफरीवर निघाले आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर दुरुस्त झालेल्या एव्हर गिव्हन जहाजावरील हिंदुस्थानी खलाशी पुन्हा एकदा नव्या जोमाने व्यापार उदिमाला निघाले आहेत.
मार्च महिन्यात चीनहून नेदरलॅण्डच्या दिशेने निघालेले ‘एमव्ही एव्हर गिव्हन’ हे 400 मीटर लांबीचे महाकाय व्यापारी जहाज जोरदार वाऱयामुळे तिरके होऊन इजिप्तमधील सुवेझ कालव्यात अडकले होते. त्यामुळे व्यापारी जहाजांचे मार्गच बंद झाले होते. परिणामी युरोप व आशियामधील समुद्रमार्गे होणारा व्यापार अक्षरशः ठप्प झाला होता. दररोज किमान 7 हजार 500 कोटी रुपयांच्या व्यापाराचे नुकसान होत होते. या जहाजावर पनामा देशाचे झेंडा होता, पण जहाजावरील बहुतांश हिंदुस्थानी खलाशी आहेत. हे खलाशी मुंबईतील ‘नॅशनल युनियन ऑफ सिअफेरर्स ऑफ इंडिया’ (नुसी) या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे जहाजाच्या दुरुस्तीनंतर या जहाजावरील खलाशांनी युनियनचे जनरल सेव्रेटरी व खजिनदार अब्दुल गणी सेरंग यांच्याशी संपर्क साधून एव्हर गिव्हन जहाज पुन्हा समुद्र सफरीवर निघाल्याची माहिती दिली.
निसर्गाच्या अवकृपेचे खापर नाविकांवर
निसर्गाच्या अवकृपेमुळे सुएझ कालव्यात जहाज अडकले. पण त्याचे खापर जहाजावर काम करीत असलेल्या नाविकांवर पह्डण्यात आले. हे जहाज बाहेर निघाल्यावर चीनमधील सुक्या गोदीत नेले आणि पुन्हा डागडुजी केली. आता अपघाताच्या धक्क्यातून सावरलेले एव्हर गिव्हन व त्यावरील खलाशी पुन्हा समुद्री सफरीला सज्ज झाले आहेत, अशी माहिती ‘नुसी’चे जनरल सेव्रेटरी अब्दुल गणी सेरंग यांनी दिली.



























































