
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऩयांच्या बैठकीत घेण्यात आला.
ऊस उत्पादक शेतकऱयांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. शेतकऱयांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. ऊस उत्पादक शेतकऩयांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
तसेच तोडणी आणि वाहतूकीबाबत निकष ठरवितानाच पुढील हंगामापासून वजनासाठी डिजीटल वजन काटे सुरू करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.



























































