
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये आत्या आणि भाच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणाचे वारे लागताच कुटुंबीयांनी आत्याचे दुसरीकडे कुठेतरी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतापलेल्या आत्याने व भाच्याने सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.
हे संपूर्ण प्रकरण संभलच्या गुन्नौर पोलीस स्टेशन हद्दीतील पाथुरी गावातील आहे. पाथुरी गावात राहणारी 20 वर्षीय महिला तिच्या भावाच्याच मुलाच्या प्रेमात पडली. भाचा गावातील वीटभट्टीवर कामाला होता. दरम्यान त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. आत्या आणि भाच्याच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरवले.
त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे तरुणीने शुक्रवारी वीटभट्टीजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेयसीच्या आत्महत्येचे वृत्त समजताच मुलाने घरी पोहोचून झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना प्रेमी युगुलाच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधिकारी कुलदीप सिंह यांनी त्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.



























































