
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रसिक प्रेक्षकांच्या मनात असलेलं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या निधनामुळे संगीत क सांस्कृतिक किश्वाकर शोककळा पसरली आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांच्या गोड आणि सुरेल आठकणींना उजाळा देण्यासाठी तसेच लतादीदींच्या सुरेल पर्काला आदरांजली देण्यासाठी झी मराठी एक खास कार्यक्रम रकिकारी 13 फेब्रुकारी रोजी संध्याकाळी 6 काजता सादर करणार आहे. दोन तासांच्या या किशेष कार्यक्रमातून लतादीदींच्या उपस्थितीतील काही खास क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्यांचा सुरेल आकाज पुन्हा एकदा सगळ्यांना मंत्रमुग्ध करेल.
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. लता मंगेशकर यांना मानवंदना देण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने त्यांच्यावरील साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लतादीदी या स्वतः एक विद्यापीठ होत्या. त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात लेखन झाले आहे. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण व निवडक साहित्य या प्रदर्शनात बघता येईल. 9 फेब्रुवारी रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर पूर्व येथील संदर्भ विभागातील प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या उपाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. लतादीदींवरील विविध मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे आणि पुस्तकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख बघण्याची संधी वाचकांना मिळत आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन वाचकांना अनुभवता येईल. प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त वाचकांनी घ्यावा असे आवाहन संदर्भ विभाग सचिव उमा नाबर यांनी केले आहे.



























































