हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल, 45 कोटी रुपये मानधनाची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suuny deol

अभिनेता सनी देओलच्या काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘गदर-2’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता सनी देओल हा नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी सनीने तब्बल 45 कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘रामायण’शी निगडित चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्टच्या नावाची चर्चा सुरू होती. तिच्याऐवजी ही भूमिका आता साई पल्लवीला मिळाली आहे. ‘केजीएफ’फेम अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचे समजते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ‘रामायण’ चित्रपट 2024मध्ये प्रदर्शित होणार आहे.