
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर हिंदुस्थानात बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली होती.
एखाद्या माध्यमावर अशा प्रकारे सेन्सॉरशिप लादता येणार नाही. ही याचिकाच पूर्णपणे चुकीची आहे. तुम्ही युक्तिवाद कसा करणार, तर्क कोणता देणार? आता आणखी वेळ वाया घालवू नका, असे खडे बोल सुनावत न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली. भविष्यात अशा स्थितीत गुंतवणूकदारांच्या हितासाठी व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत सेबीने सूचना सादर कराव्यात, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.




























































