तोल जाऊन पडल्यानेच दिशाचा मृत्यू, सीबीआयचा अहवाल

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन ही दारू प्यायलेल्या अवस्थेत होती. तशाच अवस्थेत ती तोल जाऊन 14 मजल्यावरून खाली कोसळली आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे दिशा सालियन हिचा मृत्यू हा अपघातीच होता यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.