बटलरकडे इंग्लंडचे नेतृत्व; आर्चरचे पुनरागमन

टी-20 वर्ल्ड कपसाठी इंग्लडने आपला संघ जाहीर केला असून वन डे वर्ल्ड कप मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱया जोस बटलरकडेच संघाचे नेतृत्व कायम ठेवले आहे. तसेच जोफ्रा आर्चरने संघात पुनरागमन केले आहे. आयपीएलमध्ये धम्माल करत असलेल्या विल जॅक्स, फिल सॉल्ट या धडाकेबाजांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टॉ, हॅरी ब्रुक, सॅम करण, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल राशीद, फिल सॉल्ट, रिस टॉपली, मार्क वूड.