
अर्शदीप पाकिस्तानविरुद्धच्या टी -20 विश्वचषक लढतीत मेलबर्नमध्ये पाकिस्तानच्या विकेट घेत होता, तर त्याचे वडील दर्शन सिंग चंदीगडमध्ये विकेट घेत होते. खरे तर, तणावामुळे दर्शन सिंग यांनी टीव्हीवर हिंदुस्थान – पाकिस्तान महामुकाबला पाहिला नाही. ते त्यांच्या क्लबमध्ये सामना खेळायला गेले होते. दर्शन सिंग यांनी तिथे 4 विकेट घेतल्या आणि ते सामनावीर ठरले. अर्शदीपने संपूर्ण कुटुंबाचे नाव मोठे केले. तसेच टीम इंडिया जिंकल्यामुळे तर हा आनंदही द्विगुणित झाला आहे. भुवीनेही अर्शदीपच्या अगोदर चांगली गोलंदाजी केली आणि त्याचा फायदा अर्शदीपला झाला. त्याचे वडील टेन्शनमध्ये टीव्ही बघत नव्हते, स्वतः मॅच खेळायला गेले. तिथे सामन्यात त्यांनी चार विकेट घेतल्या,अशी माहिती अर्शदीपची आई बलदीप कौर यांनी दिली.





























































