तळावासीयांचा आज शिवसेना भवनमध्ये निर्धार मेळावा, हजारो चाकरमानी उपस्थित राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, तळा

मुंबईत राहणाऱ्या तळा तालुक्यातील शिवसैनिकांचा निर्धार मेळावा उद्या शिवसेना भवनमध्ये होणार आहे. सायंकाळी 5 वाजता होणाऱया या मेळाव्यासाठी हजारो चाकरमानी उपस्थित राहणार असून आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्याचा ठाम निश्चय करणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होणार असून या सभेत तालुक्यातील शिवसैनिक, युवासैनिक तसेच मुंबई येथील गावमंडळाचे प्रमुख श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाबरोबरच शिवसेना नेते, केंद्रीयमंत्री अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी निर्धार करणार असल्याचे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख रवी मुंढे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नेते अनंत गीते, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, महिला संपर्क संघटक सुवर्णा करंजे, आमदार भरत गोगावले, तुकाराम काते, तुकाराम सुर्वे, हरिश्चंद्र म्हातले, तालुका युवाअधिकारी शैलेश घोलप, तालुका युवती अधिकारी देवयानी मोरे, शहरप्रमुख राकेश वडके, प्रभारी तालुकाप्रमुख विलास ठसाळ, विभागप्रमुख सुनील जाइलकर, सल्लागार बाळ लोखंडे, संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, अनिल नवगुणे, नंदू शिर्के, प्रतोष कोलथळकर, उदय शेलार, बळीराम घाग, गजानन शिंदे, परशुराम रामाने तसेच अन्य मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे रवी मुंढे यांनी सांगितले.