
तामिळनाडूत एक विचित्र घटना समोर आली आहे. शेजारच्या कुत्र्याला कुत्रा म्हणून डाफरल्याने झालेल्या भांडणात एकाची हत्या करण्यात आली आहे. थडिकोम्बु पोलीसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपींविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
रायप्पन (65) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. रायपन्न आपल्या शेजारच्या कुत्र्यामुळे त्रस्त झाला होता. तो सतत भुंकत असल्याने त्याच्या भुंकण्याचा रायप्पन यांना त्रास व्हायचा अनेकदा त्याच्या मालकाकडे तक्रार करुनही त्यावर काही तोडगा निघत नव्हता. कोणीही आजुबाजुने गेले तरी कुत्रा जोरजोरात भुंकायचा आणि आक्रमक व्हायचा
पण गुरुवारी रायप्पन यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कुत्र्यांच्या नावाने हाक न मारता कुत्रा म्हणून डाफरले. कुत्र्यांना पट्ट्यांने बांधून ठेवण्यास सांगितले आणि वाद वाढला. वाद सुरु असताना रायप्पनने कुत्र्यांना हाकलण्यासाठी काठी मागितली. यावर कुत्र्याचा मालक संतापला. त्याचे नातेवाईक डॅनियल आणि व्हिन्सेंट यांनाही राग आला. रायप्पनला खूप मारहाण केल्याचा आरोप आहे. रायप्पन बेशुद्ध पडला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. थडिकोम्बु पोलीसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपींविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
























































