तारापूरच्या बजाज हेल्थकेअरमध्ये पुन्हा अग्निकांड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बजाज हेल्थकेअर कंपनीत दीड महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी भीषण आग लागून एका कामगाराचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी शनिवारी पुन्हा एकदा अग्निकांड घडले. कामगारांनी वेळीच बाहेर धाव घेतल्यामुळे सुदैवाने सर्वांचा जीव बचावला. परंतु कंपनीचा गोलमाल कारभार कामगारांच्या जीवावर बेतण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

बजाज हेल्थकेअर कंपनीच्या मालकाने तारापूर औद्योगिक वसाहतीत एन झोनमध्ये 216, 217, 128 व 121 असे लगतचे चार प्लॉट एकत्र करून प्रत्येक प्लॉटवर वेगवेगळी वीज जोडणी व वेगवेगळे पाणी कनेक्शन घेतले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र घेऊन कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत फूड अॅण्ड ड्रग्सच्या परवानगीविनाच औषधांचे उत्पादन घेतले जात होते. कंपनी व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने कामगारांच्या जीवाशी खेळत अत्यंत चुकीच्या पद्धतीने उत्पादन घेत असल्यानेच 13 फेब्रुवारी रोजी भयंकर आग लागून त्यात नीलेश बोरसे या कामगाराचा होरपळून उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले.