
जम्मू-कश्मीरमधील कुलगाम येथील हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येनंतर खोऱयातील कश्मीर पंडित प्रचंड आक्रमक झाले आहेत. सरकारला निर्वाणीचा इशारा देत त्यांनी बुधवारीही तीव्र निदर्शने सुरू ठेवली. ‘टार्गेट किलिंग’विरोधात सांबा-पठाणकोट महामार्ग रोखण्यात आला. तसेच सांबामध्ये भाजप नेते रवींद्र रैना यांना घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली. पेंद्र सरकार जोपर्यंत सुरक्षेबाबत ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत शाळेत जाऊन शिकवणार नाही, असा इशारा हिंदू शिक्षकांनी दिला.
दहशतवाद्यांनी मंगळवारी शिक्षिका रजनी बाला यांची गोळय़ा घालून हत्या केली. त्यांच्या अंत्ययात्रेवेळी कश्मीर खोऱयातील हिंदू शिक्षक रस्त्यावर उतरले. ‘आम्हाला न्याय हवा’ अशा जोरदार घोषणा त्यांनी यावेळी दिल्या. भाजप नेते रवींद्र रैना हे बुधवारी रजनी बाला यांच्या घरी गेले होते. तेथे आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना घेराव घालण्यात आला. आमच्यापैकी कुणीही शिक्षक शाळेत जाणार नाही. आमच्या जिवाला धोका आहे. अशा परिस्थितीत आम्ही घरी कसे राहायचे? शाळेत कसे जायचे? असे अनेक सवाल करीत शिक्षकांनी रवींद्र रैना यांच्याविरुद्ध ‘वापस जाओ’च्या घोषणा दिल्या.
दरम्यान, कश्मिरी कर्मचाऱयांना सोमवारपर्यंत सुरक्षित ठिकाणी नियुक्ती देण्याचा निर्णय नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला आहे.
शोपियनमध्ये नागरिकावर गोळीबार
शोपियन जिह्यात एका दहशतवाद्याने नागरिकावर त्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याची घटना रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या त्या नागरिकाला पुलवामा येथील रूग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मोदीजी, हा चित्रपट नाही, कश्मीरचे वास्तव आहे! राहुल गांधी यांचा हल्लाबोल
कश्मीर पंडितांच्या ‘टार्गेट किलिंग’चे सत्र पुन्हा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कश्मीरात मागील पाच महिन्यांत 15 सुरक्षा रक्षक शहीद झाले, तर 18 लोकांच्या हत्या करण्यात आल्या. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, हा कुठला चित्रपट नाही, तर कश्मीरचे वास्तव आहे,’ असा सणसणीत टोला राहुल गांधींनी लगावला.
संक्रमण शिबिरात केले बंदिस्त
कश्मीर पंडितांनी प्रशासनाला मंगळवारी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. प्रशासनाने सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली नाही तर आम्ही सामूहिक स्थलांतर करू असा इशारा त्यांनी दिला. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीर प्रशासनाने कश्मीर पंडितांना संक्रमण शिबिरांमध्ये बंदिस्त केले आहे. कश्मीर पंडितांनी पंतप्रधान रोजगार पॅकेजमधून मिळालेल्या नोकऱयांवर बहिष्कार टाकून खोऱयात आंदोलन सुरू ठेवले आहे.




























































