चौथीतील विद्यार्थ्यांना दिली २०० उठा- बशा काढण्याची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० उठा-बशा काढण्याची अमानुष शिक्षा दिल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षा केलेल्या मुलांना चालणेही शक्य होत नसल्यामुळे पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.

श्रीरामपूर शहरापासून जवळच रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शुक्रवारी (दि. २२) चौथीच्या वर्गातील विद्यार्थी वर्गामध्ये गोंधळ घालत होते. वर्गावर गेलेले शिक्षक गणेश पाटील यांनी गोंधळ घालणाऱ्या विद्याथ्र्यांना २०० उठा-बशा मारण्याची शिक्षा दिली. त्यामुळे अनेक विद्याथ्र्यांना चालता येईना, काहींचे पाय सुजले. दरम्यान, अशाप्रकारे शिक्षा करणे चुकीचे आहे; परंतु विद्यार्थी शिस्तीसाठी शिक्षा केली असावी, असे मुख्याध्यापक विनोद रोहमारे यांनी सांगितले.