विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

विविध मागण्यांसाठी सोमवारपासून शिक्षक भरतीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी आझाद मैदानात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. पूर्ण थकबाकी, पेन्शन आणि उपदानसह सातवा वेतन आयोग लागू करावा, 104 विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे, मनपा शाळेतील मुलांप्रमाणे खासगी अनुदानित शाळेतील मुलांना 27 शैक्षणिक वस्तूंचा लाभ द्यावा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची अतिरिक्त काळातील सेवा व अनुदानापूर्वीची सेवा पेंशनसाठी ग्राह्य धरली जावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत.