
तांत्रिक कारणास्तव यूजीसी-नेट परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) तशी घोषणा केली आहे. 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत ही फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
9 जुलै रोजी यूजीसी-नेट देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पहिल्या शिफ्टमध्ये सात केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यात कोझिकोडे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी हे केंद्रही होते.
त्या केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा होऊ शकली नव्हती. दुसऱया शिफ्टमधील परीक्षा मात्र सुरळीत पार पडली. गोरखपूर, बिहार, प्रयागराज, मुजफ्फरपूर, गुजरात भावनगर येथील केंद्रांवरही तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.



























































