
बिग बॉस विजेती मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता एकता कपूरच्या ‘नागिन 6’ मध्ये दिसणार आहे. नागिनबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. दरम्यान तेजस्वीचे काही फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

तेजस्वीचा ‘नागिन’मधील लूक पाहून चाहते खुश झाले आहेत. अशावेळी तिचे चाहते तिच्या वेगवेगळ्या लूक्समधील फोटो पाहण्यासाठी सर्च करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर तेजस्वी प्रकाशचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्या सर्व फोटोंमध्ये तेजस्वीचे एकापेक्षा एक सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत.

तेजस्वी प्रकाशच्या सौंदर्याचे अनेकजण चाहते आहेत. तिचे स्टनिंग फोटो पाहून चाहत्यांना भुरळ पडली आहे.

तेजस्वीने ‘बिग बॉस 15’ मध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळी कोणालाच वाटले नव्हते की, ती या शो ची विजेती ठरेल.

बिग बॉसच्या घरात राहून तिने प्रत्येकाच्या हृदयावर राज्य केले आणि प्रेक्षकांचीही मनं जिंकली.

या शो दरम्यान टीव्ही अभिनेता करण कुंद्रा याच्यासोबत तिची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

बिग बॉसनंतरही करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशला सातत्याने एकत्र पाहण्यात येत आहे.





























































