पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकाचे अपहरण करून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुलवामा

जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका नागरिकाचे अपहरण करून त्याचा खून केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दहशतवाद्यांनी एका 40 वर्षीय व्यक्तीला त्याच्या घरातून उचलले आणि गोळी मारून त्याचा खून केला.

मंजूर अहमद लोन असे मृत व्यक्तीचे नाव असून असून तो जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये राहत होता. रात्री उशिरा दहशतवाद्यांनी त्याला घरातून उचलले आणि गुलजारपोरामध्ये आणले. त्यानंतर दहशतवद्यांनी गोळी मारून त्याचा खून केला. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून दक्षिण कश्मीरमधील गेल्या दोन दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

यापूर्वी अनंतनागमध्ये नॅशनल कॉन्फ्रेसच्या कार्यकर्त्याला गोळी लागली होती. गोळी लागून जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तर बुधवारी एका माजी सैन्य अधिकार्‍याची गोळी मारून खून करण्यात आला होता.