
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी समुद्री जिहाद पुकारल्याची माहिती आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. समुद्रमार्गे हिंदुस्थानात मुंबईवरील 26/11 प्रमाणे हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत आज दिली.
राज्यसभेत हंसराज अहिर यांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या समुद्री जिहादाबाबत लेखी उत्तरात माहिती दिली. उपलब्ध माहितीच्या आधारे पाकिस्तानातील दहशतवादी गट हिंदुस्थानची बंदरे, खोल समुद्रातील मालवाहू जहाजे आणि तेलाच्या टँकरवर मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याप्रमाणे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले.




























































