चाचण्या 34 हजार 443, बाधित 367, मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण आटोक्यात आली असून चाचण्यांच्या प्रमाणात रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण 1 टक्क्यावर आले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 34 हजार 443 चाचण्या झाल्या असताना केवळ 367 कोरोना बाधित आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दैनंदिन रुग्ण संख्या आता तीनशेवर आल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आज आढळलेल्या रुग्णांमधील 50 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 14 जणांना ऑक्सिजनची गरज लागली, तर एकाच दिवसात 841 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आता 3 हजार 219 रुग्ण राहिले आहेत.