‘ठाकरे’ फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल! बॉक्स ऑफिसवर भगवा झंझावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘ठाकरे’ या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे टीझर, ट्रेलर, गाणे सगळेच हिट ठरले आहेत. त्यातच आपल्या लाडक्या महानेत्याला एवढ्या भव्य स्वरुपात एकदम जवळून पाहता येणार असल्याने सारेच हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

शिवसेनाप्रमुखांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांनी उभी केलेली मराठी अस्मिता, हिंदुत्वासाठी पेटवलेलं रान हे सारं आजच्या पिढीला पाहायला, अनुभवायला मिळणार असल्याने अनेक चित्रपट गृहांमध्ये ऑनलाईन तिकीटे विक्री सुरू होताच हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले आहेत. तर शिवसैनिक आणि सामान्य जनतेला हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळायला हवा म्हणून राज्यातील अनेक भागात शिवसेनेचे नेते, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बूक करून ठेवला आहे. त्यांच्याकडून जनतेला हा शो मोफत दाखवण्यात येणार आहे.