
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचाच बोलबाला आहे. हिंदी व मराठी दोन्ही भाषेतील या चित्रपटासाठी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात तब्बल सोळा कोटींची कमाई केली आहे.
#Thackeray biz jumps on Day 2… Gets the benefit of #RepublicDay holiday… While #Maharashtra continues to lead, the remaining circuits show an upward trend on Day 2… #Marathi version is excellent… Fri 6 cr, Sat 10 cr. Total: ₹ 16 cr. India biz. #Hindi #Marathi
— taran adarsh (@taran_adarsh) January 27, 2019
‘ठाकरे’ हा चित्रपट संपूर्ण हिंदुस्थानात दोन हजार तर परदेशात सहाशे थिएटरमध्ये झळकला आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो पासून आतापर्यंत हा चित्रपट हाऊसफुल्ल चालला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल सहा कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 10 कोटींची कमाई केली आहे. एकूण या चित्रपटाने दुसऱ्या दिवसापर्यंत सोळा कोटींचा गल्ला जमवला आहे.
#Thackeray has scored in #Maharashtra specifically… #Marathi version has collected very well… #RepublicDay holiday [today] should help escalate its biz… Fri ₹ 6 cr. India biz. #Hindi #Marathi
— taran adarsh (@taran_adarsh) January 26, 2019




























































