भाजपची पहिली यादी गुरुवारी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदींसह 100 उमेदवार

2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप गुरुवारी आपली पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 100 उमेदवारांच्या नावाचा समावेश असेल. मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 29 फेब्रुवारीला भाजपने पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करून यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत काही केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचाही समावेश असणार आहे. तसेच राज्यसभा खासदार राहिलेल्या नेत्यांनाही भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.