
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या ११ लाख जनावरांना जगवण्यासाठी जिल्ह्यात चारा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. संभाजीनगरातून बाहेर चारा विक्रीला बंदी घालण्यात आली असून कलम १४४ (२) लागू करण्यात आले आहे.
पाऊसच न पडल्याने संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. चारा-पाण्याची गंभीर समस्या असल्याने ११ लाख जनावरांना मोठा फटका बसणार आहे. जनावरांची आबाळ होऊ नये यासाठी आज जिल्ह्यात चारा आणीबाणी लागू करण्यात आली. त्यानुसार आता जिल्ह्याबाहेर चारा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार ही मनाई करण्यात आली आहे.

































































