पैसे काढायला आले; बॅटऱ्या घेऊन गेले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दारू प्यायला पैसे कमी पडले म्हणून दोघे टिळकनगर येथील एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये गेले. पैसे काढत असताना त्यांची नजर तेथे असलेल्या कम्प्युटराइझ बॅटऱ्यांकडे गेली. मग दोघांनी त्या बटऱ्या लंपास करायचे ठरवले. त्यानुसार सर्व बॅटऱ्या दोघांनीही चोरल्या. १६ लाख रुपयांच्या १६ बॅटऱ्या त्यांनी शिवाजीनगर येथे भंगारवाल्याला १० हजारांत विकल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडले आणि १० हजार व गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली.

टिळकनगर येथे एसबीआयचे एटीएम सेंटर आहे. वाशीनाका येथे राहणारे हितेश होस्तेकर (२५) आणि रोहित धुरी हे दोघे ३१ मेच्या रात्री घाटकोपर येथे दारू पित बसले होते. आणखी दारू हवी म्हणून दोघेही टिळकनगर येथील एटीएम सेंटरमध्ये गेले. पैसे काढत असताना एटीएम सर्व्हिसिंगचे काम करणाऱया रोहितचे लक्ष तेथे असलेल्या बॅटऱयांवर गेले. मग दोघांनी मिळून १६ बॅटऱ्या हितेशच्या कारमधून चोरून नेल्या.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे व पोलीस निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल अंबवणे, अंमलदार तानाजी सुळे, केशव तकीक, विशाल भालेराव, धनावडे या पथकाने तपास सुरू केला. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीमध्ये आरोपी कोण ते स्पष्ट झाले. तसेच बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुह्यांत वापरलेल्या आर्टिगा कारचा नंबर मिळून आला. त्या नंबरवरून कार व मालकाचा शोध घेतल्यावर ती कार हितेशची असल्याचे कळताच पोलिसांनी हितेश आणि रोहितला अटक केली.