
जूने फोन विकून नविन फोन घेताना काही गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. कुणीही तुमच्या फोनमधील डेटाचा मीस यूझ करू शकतो.
बॅकअप
फोन कुणाला विकण्याआधी त्यातील डेटाचा बॅक घेणं अत्यावश्यक आहे. कॉन्टॅक्ट, मेसेज, कॉल रेकॉर्ड, फोटो-व्हिडीओ आणि काही जरूरी फाइल्सचं बॅकअप घ्यायला विसरू नको. याकरिता एक्सटर्नल मेमरीची मदत घेऊ शकता.
फॅक्ट्री रिसेट करण्याआधी सर्व अकाउंट लॉग आउट करा
फॅक्ट्री रिसेट करण्याआधी सर्व गुगल आणि दुसरे ऑनलाइन अकाउंट लॉग आउट करा. त्यानंतर फोनमधील फॅक्ट्री रिसेटचा पर्याय वापरा. लॉगिन अकाउंट्स फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन पाहू शकतात.
microSD काढून टाका
View this post on Instagram
फोनमधील microSD कार्ड वापरत असाल तर ते काढून घ्या. कार्ड काढून घेण्याआधी त्यातील डेटा सेफ आहे की नाही ते एकदा तपासा. त्यानंतर फोनमधून SIM काढून ठेवा.
WhatsApp बॅकअप
जर तुमचे WhatsApp मेसेज, डेटा महत्त्वाचा असेल तर बॅकअप घ्यायला विसरू नका. आपल्या नव्या डिवाइसवर WhatsApp चॅट्स रिस्टोअर करू शकतात.
फोन एन्क्रिप्टेड आहे की नाही
फॅक्ट्री रिसेट करण्याआधी फोन एन्क्रिप्टेड आहे की नाही ते तपासा. जर नसेल तर मॅन्युअली तसे करू शकतात. त्यामुळे कुणाला फोनचा डेटा घेणे कठीण असते. बरेच नवीन फोन एन्क्रिप्टेड असतात.




























































