जुना फोन अडगळीत टाकू नका, असा बनवा ‘तिसरा’ डोळा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवा फोन घेतल्यानंतर जुन्या फोनचे महत्त्व तसेही कमी होते. मग तो फोन एक तर अडगळीमध्ये पडून राहतो किंवा रिसेल केला जातो. परंतु काहीवेळा त्या फोनवर आपला विशेष जीवही जडलेला असतो. त्यामुळे तो अडगळीमध्ये पडावा असेही वाटत नाही आणि रिसेल करावे असेही वाटत नाही. पण एकदा नवा फोन घेतला की जुन्या फोनचे करायचे काय हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होतो. परंतु याच जुन्या फोनचा वापर करून तुम्ही तुमचे घर, दुकान सुरक्षित बनवू शकता.

दुकान किंवा घराच्या सुरक्षिततेसाठी सध्या सिक्यूरिटी कॅमेरा आवश्यक बनला आहे. परंतु या कॅमेऱ्यांची किंमतबी मजबूत असल्याने ती प्रत्येकाला परवडेल असे नाही. त्यामुळे जुन्या फोनचा वापर तुम्ही तिसरा डोळा म्हणूनही करू शकता. ते कसे? पाहूया…

> तुमच्या जुन्या फोनमध्ये गूगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असलेले कोणतेही सिक्यूरिटी कॅमेरा अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर या अॅपला ओपन करून त्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन करा.

> अॅपमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर घरातील किंवा दुकानातील अशी जागा पाहा जेथून संपूर्ण भाग कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होऊ शकेल.

> जागा फिक्स झाल्यानंतर फोनला सेट करण्यासाठी ट्रायपॉडचा वापर करा. दिवसभर कॅमेरा सुरू राहिल्याने फोनची बॅटरी उतरू शकते, त्यामुळे शक्यतो अशी जागा निवडा जिथे पॉवर सॉकेट जवळ असेल.