येऊरमध्ये शिकारीसाठी सापळे लावणाऱ्यांची होणार ‘शिकार’; वनविभागाचे कोम्बिंग ऑपरेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येऊर जंगलात गेल्या काही दिवसांत माकडे तसेच बिबट्यांच्या शिकारीचे प्रकार वाढले आहेत. आता जंगलातील वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी शिकाऱ्याकडून सापळे लावण्यात आले असल्याचे समजताच वनविभागाने आता कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी शिकारींवर करडी नजर ठेवतानाच वनविभागाचे पथक येऊरच्या जंगलात असे सापळे शोधून ते उद्ध्वस्त करत आहेत.

  • सावजासाठी सापळे लावणाऱ्यांना सापळ्यात पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत. या मोहिमेदरम्यान जंगलातील अतिदुर्गम भागात विशेष पथकांकडून सखोल तपासणी करण्यात येत आहे.
  • वन्यप्राण्यांना अडकवण्यासाठी लावलेले फासे, सापळे किंवा अन्य बेकायदेशीर साधनांचा शोध घेण्यात येत आहे. यासोबतच संवेदनशील ठिकाणांची नोंद करून भविष्यातील धोके टाळण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे.
  • अली कडील काही शिकारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विभागाने ‘सापळे शोध मोहीम’ राबवून जंगल ातील संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

जंगलातील हालचालींवर लक्ष
मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. वनविभागाच्या या कारवाईत स्थानिक वनाधिकाऱ्यांसह वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन व रेस्क्यू असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेल्फेअर या संस्थांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जंगलातील हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यजीवांची शिकार रोखणे, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि जैवविविधतेचे संतुल न टिकवून ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. सापळे शोधमोहिम नियमितपणे राबवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून शिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येणार आहे.