पाताळगंगा नदीत हजारो गॅस सिलिंडर्स वाहून गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नद्यांना आलेल्या पूरस्थितीचा फटका अनेक कंपन्यांना बसला. पाताळगंगा एमआयडीसीमधील एचपीसीएल या कंपनीच्या बॉटलिंग प्लाण्टमधून पाताळगंगा नदीपात्रात हजारो घरगुती गॅस सिलिंडर्स आज वाहून गेले. त्यातील काही अर्धवट भरलेले होते, तर काही रिकामे होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.