
आग लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, आग लागलीच तर सर्वप्रथम कोणत्या उपाययोजना कराव्यात किंवा बचाव करावा याबाबत जनजागृती करण्यासाठी माटुंगा येथे घेतलेल्या मॉकड्रिलमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले. जखमींना पालिकेच्या शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जवानांचे काम कसे चालते, आगीनंतर कसा बचाव करावा याबाबत शनिवारी माटुंगा येथील साई सिद्धी इमारतीत मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाण्याचा दाब वाढला आणि दोन गाड्यांपैकी एक गाडी अचानक सुरू झाली आणि त्यात तीन जवान जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत चालक सदाशिव धोंडिबा कर्वे (53) हे गंभीर जखमी झाले असून चंचल भीमराव पगारे आणि निवृत्ती सखाराम इंगवले या तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




























































