मेलबर्नमध्ये टीम इंडियाला साजेशी खेळपट्टी तयार केली होती, ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मेलबर्न

मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी धूळ चारली. मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. हा पराभव ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी लागला असून आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. मेलबर्नवरची खेळपट्टी ही टीम इंडियाला फायदेशीर ठरेल अशी तयार करण्यात आली होती असा आरोप त्याने मेलबर्न मैदानाच्या क्युरेटरवर केला आहे.

‘मेलबर्नची खेळपट्टी अशी आहे की मी जर टॉस जिंकलो असतो तर मी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असता. मात्र ही खेळपट्टी ऑस्ट्रेलियाच्या संघाला नाही तर हिंदुस्थानी संघाला फायदेशीर ठरेल अशी तयार करण्यात आली होती. आमच्या फलंदाजांनी देखील अतिशय सहज विकेट्स दिल्या. त्यामुळे आम्ही हरलो. आशा करतो की सिडनी मध्ये असे नसू दे.’ असे पेनने एका मुलाखतीत म्हटले आहे.