रंग खेळण्यासाठी नेहमी सुटसुटीत व अंगभरून कपडे वापरावेत. ज्यामुळे त्वचा काळवंटणार नाही.
चन्याच्या पीठात दूध व साय टाकून एकत्र करावी. हा लेप 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवावा.नंतर चेहऱा धुतल्यास रंग लवकर उतरतो.
रंग खेळण्याआधी चेहऱ्याला,नारळाचे किंवा बदामाचे तेल लावावे. असे केल्यास कुठलाही रंग जास्तवेळ शरीरावर टीकून राहणार नाही. साध्या पाण्याने चेहरा धुतला तरी रंग लवकर निघतो.
रंग खेळताना जास्तीत जास्त लिक्विड डाएट घ्यावे.कारण अंगाला रंग चिकटल्याने त्वचा कोरडी होते. रंग लवकर जात नाही.