नांदा सौख्यभरे ! तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके अडकले विवाहबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे आज विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांचा विवाह पारंपारीक पद्धतीने मोठ्या थाटामाटात पार पडला.

तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके या दोघांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीड़ियावर दोघांचा फोटो शेअर करत आपल्या नात्याची कबूली दिली आणि सर्वांनात आश्चर्याचा धक्का दिला. रविवारी त्यांचा साखरपुडा सोहळा झाला आणि आज दोघं विवीहबंधनात अडकले.

दोघांच्या लग्नातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तितिक्षाने मोती रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. या साडीला सोनेरी रंगाचा काठ असून त्यावर सोनेरी रंगाचे नक्षीकाम आहे. तर साडीवर तिने त्याच रंगाची शालही घेतली आहे, तर त्यावर कॉन्ट्रास्ट सोनेरी रंगाचा ब्लाऊजही घेतला आहे. तर सिद्धआर्थने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. दोघंही या फोटोत खूप सुंदर दिसत आहेत. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडत आहे.