लाच घेतल्‍याप्रकरणी मंडल अधिकार्‍यासह एकाला अटक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

सातबारा उताऱ्यावरील नाव कमी केल्याची नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी कोपरगाव येथील मंडळ अधिकारी काशीनाथ राधाकीसन वाघ (54)व जनार्दन रतन शिंदे (28) रा कारवाडी ता. कोपरगाव या दोघांना नाशिक लाचलुचपतब प्रतिबंधक  विभागाचे पोलीस निरक्षक हेमंत कुमार भामरे व त्यांच्या पथकाने आज रंगेहात पकडले. यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. यातील आरोप मंडळ अधिकारी वाघ यांच्याकडे हिंगणीचा ही कारभार दिलेला आहे.

याबाबतची भामरे यांनी दिलेली माहिती अशी, हिंगणी, ता कोपरगाव येथील तक्रारदारडे सात बारा वरील नाव कमी केल्याची नोंद मंजूर करण्यासाठी वाघ याने 5 नोव्हेंबर रोजी 4 हजार रुपये लाच म्हणून मागितली. ती त्याने आज 13 नोव्हेंबर रोजी स्वीकारली. सदर रक्कम वाघ याच्या सांगण्यावरून जनार्दन शिंदे या आरोपीने स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.