Toyota Innova Hycross हिंदुस्थानात लाँच, जाणून घ्या डिटेल्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुप्रतिक्षित टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) शुक्रवारी हिंदुस्थानात लॉंच करण्यात आली. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही MPV सेगमेंट मधील कार असून ती स्मार्ट आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा नंतर टोयोटाने हायक्रॉस ही फॅमिली हायब्रीड कार बाजारात आणली आहे. हायब्रीड पॉवरट्रेनसह, नवीन इनोव्हा हायक्रॉस हिंदुस्थानी बाजारात दाखल झाली असली तरी, कंपनीने आधीच्या इनोव्हा क्रिस्टाची विक्री सुरूच ठेवली आहे.

टोयोटा किर्लोस्करच्या न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (टीएनजीए ) प्लॅटफॉर्मवर तयार केलेली ही 5च्या जनरेशनची सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टीम असणारी कार 21.1 km/l मायलेज देते. ही गाडी उच्च राइडच्या गुणवत्तेसह टोयोटाच्या हिंदुस्थानी ग्राहकांसाठी मल्टी-पाथवे ऑफर देते. हायक्रॉस ही सध्या दोन श्रेणींमध्ये उपलब्ध आहे. पॉवरट्रेन ग्रेड हायब्रीड इलेक्ट्रिक हे व्हेरिएंट ZX, ZX (O), VX 8S, VX 7S, आणि गॅसोलीन हे व्हेरिएंट GX 8S, GX 7S, G 7S, G 8S

इनोव्हा हायक्रॉसची प्रमुख वैशिष्ट्ये

1. टोयोटा हायब्रिड सिस्टीम आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशनसह टीएनजीए 2.0-लिटर इंजिनसह 137 kW (186 पीएस) पॉवर आउटपुट देते. या व्हेरिएंट मध्ये सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड सुविधा उपलब्ध आहे. तसेच गॅसोलीन ग्रेड टीएनजीए 2.0 लिटर इंजिन 128 kW (174 पीएस) आउटपुट देते.

2. बाह्य वैशिष्ट्ये
– पॅनोरामिक सनरूफ
– गन मेटल फिनिशसह फ्रंट ग्रील
– ऑटो हाय बीमसह स्वयंचलित एलईडी हेडलॅम्प
– ड्युअल फंक्शन डेटाइम रनिंग लाइट (डीआरएल)

3. आतील वैशिष्ट्ये / आराम आणि सुविधा

पॅडल शिफ्ट, पॉवर्ड ऑट्टोमन 2 रा रो सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, एअर कंडिशनर (ड्युअल झोन – फ्रंट आणि रिअर झोन), रिअर रिट्रेक्टेबल सनशेड, इलेक्ट्रोक्रोमिक इनर रिअर व्ह्यू मिरर (ईसी आयआरव्हीएम ), आणि पॉवर बॅक डोअर

इतर प्रमुख वैशिष्ट्ये

टीएफटी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले
ड्रायव्हर सीट मेमरी आणि स्लाइड रिटर्न आणि अवे फंक्शन
इनडायरेक्ट ब्ल्यू एम्बिएंट इल्युमिनेशन

4. इन्फोटेनमेंट सिस्टम
-प्रीमियम, जेबीएल 9 स्पीकरसह कनेक्टेड 25.65 सेमी (10.1”) कनेक्ट केलेला डिस्प्ले ऑडिओ
टोयोटा कनेक्टेड कार टेकनॉलॉजी – आय कनेक्ट

5. सुरक्षा वैशिष्ट्ये

टोयोटा सेफ्टी सेन्सेटीएम ज्यात (डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेस असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, प्री -कोलिजन सिस्टम, ऑटो हाय बीम) सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे

6. एसआरएस एअरबॅग्ज
रिअर डिस्क ब्रेक्स
व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल (व्हीएससी) आणि हिल स्टार्ट असिस्ट
ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (ईपीबी ).
इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स सह अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस)
डायनॅमिक बॅक गाइडसह पॅनोरामिक व्ह्यू मॉनिटर

Toyota Innova Hycross च्या मुंबईतील लाँचच्या वेळी टोयोटा इनोव्हाचे चीफ इंजिनियर हिदेकी मिझुमा, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मसाकाझू योशिमुरा उपस्थित होते.