पश्चिम उपनगराची वाहतूककोंडी फुटणार; पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम उपनगराची वाहतूककोंडी आता फुटणार आहे. वनविभागाच्या हद्दीत असलेल्या 400 मीटरच्या रस्त्याची एनओसी वनविभागाकडे गेली अनेक वर्षे अडकली होती. मालाड पूर्व जलाशय टेकडी ते कांदिवली लोखंडवाला संकुल या 1300 मीटर रस्त्याच्या मार्गातील हा अडसर दूर झाला असून महापालिकेने या कामासाठी निविदा काढली आहे. यामुळे या प्रलंबित रस्त्याचे काम मार्गी लागले असून उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुलदरम्यानच्या 120 फुटी रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र मधल्या टप्प्यातील 400 मीटर रस्त्याचे काम वन खात्याच्या हद्दीत येत असल्याने अनेक वर्षे अडकले होते. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकांमुळे हे काम आता मार्गी लागणार आहे. सदर रस्त्याला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी आणि येथील वाहतूककाsंडी पह्डण्यासाठी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गर्शनाखाली शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी आदित्य ठाकरे तसेच नगरविकासमंत्री यांच्याकडे मागणी केली होती. यासंदर्भात संबधित अधिकाऱयांची सह्याद्री अतिथीगृहात स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर व आमदार प्रभू यांच्यासमवेत संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत सदर रस्त्याचे काम मार्गी लावा, असे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिले होते.

वनखात्यातील जैवविविधतेला बाधा न आणता महानगरपालिकेने 2 नोव्हेंबर रोजी मालाड जलाशय टेकडी ते आप्पापाडा या वनखात्याच्या जागेतून जाणाऱया आणि कांदिवली पूर्व लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱया सदर 36.60 मीटर लांब आणि 18.30 मीटर डीपी रोडच्या कामाची  निविदा काढली आहे. आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न आता लवकर मार्गी लागणार असून भविष्यात मालाड जलाशय टेकडी ते कांदिवली पूर्व लोखंडवालादरम्याचे अंतर कमी वेळात पूर्ण होणार आहे. यासंदर्भात मुंबईचे उपमहापौर अॅड.सुहास वाडकर, दिंडोशी विधानसभा संघटक विष्णू सावंत व प्रशांत कदम यांनीही आग्रही मागणी केली होती.