Trans-Harbour Line – रुळाखालील माती खचल्याने ट्रान्स हार्बर रेल्वे ठप्प, प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे या मार्गाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी अगदी कामाच्या वेळेत ट्रान्स हार्बर बंद पडल्याने कामासाठी निघणाऱ्यांचे हाल झाले आहेत. तुर्भे आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील माती खचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे.