
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
नवी दिल्लीतील सिग्नेचर पुलावर सेल्फीच्या नावाखाली तृतीय पंथियांच्या एका टोळक्याने कपडे काढून नंगा नाच केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच हे टोळके भररस्त्यात अश्लील चाळे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दिल्लीत काही महिन्यांपासून तृतीय पंथियांनी धुमाकूळ घातला आहे. तृतीय पंथियांची टोळकी भररस्त्यात कपडे उतरवून नाचत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कृत्रिम अवयवरोपण करुन हे तृतीय पंथीय अर्धनग्न होऊन रस्त्यात नाचत असल्याने नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. हे तृतीयपंथी गर्दी असलेल्या ठिकाणी कपडे काढून सेल्फी काढतात. तर कधी मध्यरात्री स्कूटीवर बसून शहरभर धिंगाणा घालतात. यामुळे दिल्ली पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
























































