आंबा घाटातील वाहतूक सुरु; खासदार विनायक राऊत यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी-कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटातील वाहतूक गेले काही महिने बंद होती. दरड कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. त्यानंतर कोसळलेली दरड हटवून हलक्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र अवजड वाहतूक बंद होती. त्यानंतर मंगळवारपासून आंबाघाटातील एसटी आणि सहाचाकीची वाहतूक सुरु करण्यात आली असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

आंबा घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे वाहतूकदारांना अणुस्कुरामार्गे प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय सुरु होता. त्यामुळे आंबाघाट लवकरात लवकर सुरु करावा, अशी मागणी व्यापारी आणि व्यावसायिकांकडून होत होती. खासदार विनायक राऊत यांनी आंबाघाटात जात पाहणी करत घाट लवकर सुरू करण्याबाबत सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत एसटी बससेवा आणि अवजड वाहतूक सुरु करण्याबाबत निर्णय झाला होता. मंगळवारपासून पुन्हा आंबाघाटातील वाहतूक सुरु करण्यात आली असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.