
सामना ऑनलाईन।अंबाजोगाई
शौचानंतर पाण्यात उतरलेल्या दोन भावंडाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातीत मुर्ती शिवारात घडली आहे. असुन बर्दापूर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्रज्योल पद्माकर कांबळे ( ८) आणि प्रेमचंद पद्माकर कांबळे (६०) अशी या दोघांची नावे आहेत.
हे दोघे पट्टीवडगाव ता अंबाजोगाई येथील रहिवासी आहेत. पद्माकर त्यांच्या वडिलांचे नाव असून सरला आईचे नाव आहे. ते टोकवाडी येथील विट भट्टीवर कामाला असून दोनच दिवसांपूर्वी ते पट्टीवडगाव येथे मंजूर झालेल्या घरकूलाची कागदपञे देण्यासाठी आले होते.त्यानंतर राञी कांबळे कुटुंब मुर्ती येथे आजोबांना भेटण्यासाठी गेले होते.
तलावाच्या बाजूच्या शेतातील गट नंबर १७९ मध्ये आजोबा हनुमंत कांबळे शेतीची मशागत करीत असताना दोघा भावंडानी आजोबांना पिण्यासाठी पाणी आणून दिले. त्यानंतर शौचासाठी ते परत तलावाजवळ गेले .त्यानंतर ते पाण्यात उतरले असता त्यांचा तोल गेला व दोघेजण पाण्यात बुडाले.


























































