कुत्र्याला दगड मारला ….भाजीविक्रेत्या मुलांनी बारा वर्षांच्या मुलाला भोसकले

850
murder-knife

पाळीव कुत्र्याला दगड फेकून मारण्याचा जाब विचारणाऱ्या बारा वर्षांच्या मुलाला दोन भाजी विक्री करणाऱ्या मुलांनी चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दर्गा परिसरातील जाबिंदा परिसरात घडली. चाकून भोसकल्यानंतर दोघांनी हाचतगाडी सोडून पळ काढला. जखमी अवस्थेत मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दर्गा परिसरातील परिसरात राहणारा जगजित जगपाल सिंग संधू हा घरात असताना 13 आणि 14 वर्षांची दोन अल्पवयीन मुले हातगाडीवर भाजीपाला विक्री करत होती. दोघांनी भाजी विक्रीसाठी आवाज लावल्याने, घरातील कुत्रा या दोघांच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे दोघांनी कुत्र्याच्या दिशेने दगड भिरकावला. दगड भिरकावल्याचा जाब विचारण्यासाठी जगजित हा घराबाहेर पडला असता दोघा भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवरील चाकू जगजितच्या पोटात खुपसला. यात तो जागीच रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. अचानक झालेल्या चाकूहल्ल्याने गंभीर जखमी झालेल्या जगजितने आरडाओरड करताच हल्ला करणाऱ्या दोन्ही मुलांनी  भाजीचा गाडा सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

जगजित याला जाबिंदा स्टेट परिसरातील नानागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती देत एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून अल्पवयीन भाजी विक्रेत्यांची हातगाडी आणि चपला जप्त केल्या. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून हल्ला करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांना गारकेडा परिसरातील इंदिरानगरातून ताब्यात घेतले. या पिरकरणी गुरुगोविंदसिंहपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार उपेंद्र कुत्तूर यांनी नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या