Video – मास्क नाकाखाली आला, पोलिसांनी भयंकर चोपला; व्हायरल व्हिडीओनंतर निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mp-police

मार्च-एप्रिलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट येऊन थडकली आणि प्रशासनाने पुन्हा एकदा लोकांना जाणीव व्हावी म्हणून कडक कारवाई सुरू केली. महाराष्ट्रात पोलिसांनी दंडुक्याचा वापर न करता दंड आणि समज असा पवित्रा घेतला आहे. पण मध्य प्रदेशमध्ये मात्र अजूनही दंडुक्याचा वापर करण्यात येत आहे. इंदुरमध्ये मास्क न घातलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी तुफान मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फिरोज गांधी नगरात राहणाऱ्या या 35 वर्षाच्या व्यक्तीचे नाव कृष्णा कुंजीर आहे.

कृष्णा याने सांगितले की तो रिक्षा चालवतो. मंगळवारी आपल्या वडिलांना डबा देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात होता. त्याच्या तोंडावर मास्क होता पण तो नाकाच्या थोडा खाली गेला होता. त्यामुळे पोलिसांनी अडवले आणि पोलीस ठाण्यात सोबत चल असे सांगितले. मात्र त्याने नकार दिल्यावर दोघा पोलिसांनी त्याला प्रचंड चोपले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच कुटुंबातील महिलांना देखील मारहाण केली. अधिक पोलीस बल मागवत त्यांना पोलीस ठाण्यात नेले. कृष्णाच्या मुलाने त्यांना वारंवार विनंती केली मात्र त्यांनी काही ऐकले नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.