शिवरायांचा भगवा लोकसभेवर फडकवायचा आहे -उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

  • शिवरायांचा भगवा लोकसभेवर फडकायवचा आहे.
  • विजयी झाल्याशिवाय विश्रांती घ्यायची नाही.
  • जिथे शिवधनुष्य तिथे  शिवसेना, जिथे कमळ तिथे भाजप
  • युतीचे वातावरण हे हसतं खेळतं रहावं
  • कर्जमाफी झालीच पाहिजे हा माझा आग्रह
  • पवारांनी फक्त स्वतःच्या मुलांचे लाड केले
  • खुर्ची हवी पण देशाच्या संरक्षणासाठी आणि बलवान करण्यासाठी हवी
  • विरोधी पक्षांवर अजून टीका करायला सुरुवात केली नाही.
  • नरेंद्र मोदींशिवाय पर्याय आहे का?
  • पक्ष ही विचारधारा असते.
  • सैनिकांचे मनोधैर्य वाढवले तर पाकिस्तानची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही.
  • अभिनंदन परत आले सुदैव
  • फक्त सर्जिकल स्ट्राईक नको, पाकिस्तानच्या चिंधड्या उडवा
  • विरोधी पक्षांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा
  • मोदींच्या नेतृत्वावर मतभेद नाही
  • आपल्या देशात पाकिस्तानचे हस्तक कमी नाही
  • युतीला नवी पालवी फुटली ती भगव्या रंगाची
  • युती केल्याचे समाधन
  • गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहून गहिवरलो
  • आजही वंदे मातरम न म्हणनारी औलाद हिंदुस्थानात
  • मुलायम सिंह यांनी कारसेवकांवर गोळीबार केला.
  • देव, देश आणि धर्मासाठी युती – उद्धव ठाकरे
  • काँग्रेस राष्ट्रवादी हम आपके है कौन  सुरू
  • वातावरण खूप चांगले
  • मला विजय आणि सुजय दोन्ही हवे – उद्धव ठाकरे
  • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
  • रोखठोक करण्यासाठी संजय राऊत समर्थ
  • मी फक्त सामना वाचतो
  • हिंदुस्थान मोदींच्या हाताखाली सुरक्षित
  • चुकून काँग्रेसला सत्ता मिळाली तर  शालेय पुस्तकात औरंगजेबजी  वाचायला मिळेल
  • राष्ट्रीय विचारांना प्रेरित एनडीएचे सरकार
  • पंतप्रधान मोदींनी सैन्याला पूर्ण मोकळीक दिली
  • जवानांकडे पुरावा मागणार्‍या पक्षाला जनता निवडून देईल का?
  • विरोधी पक्षांनी सैन्याकडून पुरावा मागितला.
  • महाराष्ट्रात २१ हजार कोटींची कर्जमाफी केली.
  • जोपर्यंत शेवटचा शेतकर्‍याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही योजना सुरू राहणार
  • २०२१ पर्यंत प्रत्येक गरीबाला घर
  • पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सर्वाधिक घरे
  • आयुष्यमान योजनेमुळे गरींबाना जीवदान
  • उज्वला योजनेतून राज्य सरकाने महिलांना धुरापासून मुक्तता दिली.
  • याचा चांगला फायदा आमच्या माया भगिनींना झाला
  • राज्य सरकारने महाराष्ट्र हागणदारी मुक्त केली.
  • विरोधकांचे महागठबंधन नाही तर महाठगबंधन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला
  • जनधन खात्यामुळे एक रुपया पूर्ण गरीबाच्या खात्यात
  • गरीबी हटवणार्‍यांनी स्वतःचीच गरीबी हटवली.
  • केंद्र आणि राज्य सरकारने सामान्य माणसांसाठी काम केले.
  • ही युती फक्त निवडणुकीपुरती नाही, ये फेविकॉल का जोड है
  • आमच्या युतीमुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले – फडणवीस
  • या धाग्यामुळे आम्ही एकत्र- फडणवीस
  • शिवसेना भाजप युतीचा धागा हिंदुत्वाचा-फडणवीस
  • विरोधी पक्षांची युती ही फक्त खुर्चीसाठी होती
  • कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले आहे- फडणवीस
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात
  • आम्ही संविधान बदलणार नाही- रावसाहेब दानवे
  • फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवू- काँग्रेस राष्ट्रवादीला दानवेंचे आव्हान
  • केंद्र सरकार आणि राज्य सरकारने भरीव कामगिरी केली.
  • शिवसेना भाजप एकाच आवाजात घोषणा देतील – राव साहेब दानवे
  • भाजप प्रदेशाध्यक्ष राव साहेब दानवे यांच्या भाषणाला सुरूवात
  • मोदी आणि देवेंद्रजी तुमच्या मागे महाराष्ट्र ठाम उभा आहे-  संजय राऊत
  • झालं गेलं ते गोदावरीला मिळालं
  • मैत्रीत मतलब नाही; देव, देश आणि धर्म हा आपला धर्म
  • देशात स्थिर सरकार देण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान
  • एक नवीन वातावरण राज्यात आणि देशात निर्माण झाले आहे.
  • युतीचा मेळावा घेताना आम्हालाही भरून आले- संजय राऊत
  • देवेंद्र फडणवीस हे राज्याचे लाडके मुख्यमंत्री – संजय राऊत
  • खासदार संजय राऊत यांच्या भाषणाला सुरूवात
  • युती झाल्यानंतर आपली ताकद दुप्पट झाली- गिरीष महाजन
  • युती झाल्यानंतर खूप बरं वाटतंय- गिरीष महाजन
  • पालक मंत्री गिरीष महाजन यांच्या भाषणाला सुरूवात.
  • सभास्थळी शिवसेना नेते संजय राउत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित

  • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेळाव्यात आगमन

शिवसेना-भाजप युतीच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.