उदगीरमध्ये मोटरसायकल चोरास पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। उदगीर

लातूर जिल्ह्यात दररोज मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. उदगीर पोलिसांनी मात्र याप्रकरणी विशेष पथकाचे नेमणूक करून एका मोटरसायकल चोरास पकडण्यात यश मिळवले आहे. त्याच्याकडून तब्बल अठरा चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने हुसेन नागनाथ कांबळे राहणार गंगापुर तालुका उदगीर यास ताब्यात घेतले. त्याने चोरलेली मोटरसायकल लातूर जवळील बाबळगाव रोडवरील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या बालाजी येलगटे राहणार गोंद्री तालुका औसा यास खोटे बोलून विकली होती. या माहितीवरून पोलिसांनी हुसेन कांबळे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने लातूर उदगीर कमलनगर रेल्वे स्टेशन कर्नाटक येथून मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटरसायकली त्याने खोटी कारणे देऊन कमी किमतीत विकल्या होत्या. त्याची सासरवाडी सय्यदपुर , गंगापूर भाकसखेडा देवर्जन अशा विविध ठिकाणी मोटरसायकल विकल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तब्बल 18 मोटरसायकल जप्त करण्यात यश मिळवले. यामध्ये एक बुलेट होंडा शाइन पॅशन प्रो पॅशन प्लस हिरो स्प्लेंडर हिरो होंडा सीडी डीलक्स हिरो होंडा सीडी डॉन बजाज पल्सर बजाज दिस्कवर बजाज सिटी हंड्रेड अशा सर्व प्रकारच्या मोटरसायकलचा समावेश आहे. या तपासासाठी पोलीस कर्मचारी सुधाकर केंद्रे विलास फुलारी महेश खेळले राजू घोरपडे कृष्णाचा आम्ही श्रीहरी डावरे बाळू आगलावे यांनी विशेष परिश्रम घेतले.