या गावात आहे पुरुषांना बंदी, वाचा काय आहे कारण

जगभरात स्त्री पुरुष समानतेसाठी मोठे लढे दिले गेले आहेत. अनेक देशात आजही स्त्रीला पुरुषासारखा समान दर्जा मिळत नाही. पुरुषांची मक्तेदारी चालते अशा एका देशात एक असेही गाव आहे ज्या गावात फक्त महिलाच राहतात. केनया या देशातील उमोजा असे त्या गावाचे नाव असून या गावात पुरुषांना येण्यास बंदी आहे. आणि चुकून एखादा पुरुष गावात आलाच तर त्याला या महिला थेट पोलिसांच्या ताब्यात देतात.

उमोजा हे असे गाव आहे जे काही हिंसेच्या बळी ठरलेल्या महिलांनी एकत्र येऊन तयार केलेले आहे. केनयात एखाद्या महिलेसोबत बलात्कार, विनयभंग सारख्या घटना घडल्या की तिला तिचे कुटुंबीय घरात घेत नाहीत. त्यामुळे अनेक महिला बेघर होतात. अशाच काही महिलांनी 1990 साली एकत्र येऊन राहायला सुरुवात केली. हळू हळू हे गाव अशा महिलांसाठी आश्रयाचे ठिकाण बनले. त्यानंतर घरगुती हिंसाचाराने त्रासलेल्या विवाहीत महिला देखील या गावात येऊन राहू लागल्या आहेत. या गावातील बहुतांश महिला या सुंबरु जातीच्या असून या जातीत एकापेक्षा जास्त विवाह मान्य आहेत.

अनेक महिलांची मुलेही त्यांच्यासोबत होती. मात्र ही मुलं मोठी झाली की ती देखील या गावातून निघून जात. मग काही वेळेस त्यांच्या आयाही त्यांच्यासोबत जात. सध्या या गावात 85 महिला आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या